शेअरचॅटची यशोगाथा
शेअरचॅट ही एक सोशल मीडिया कंपनी आहे जिचे संस्थापक उपसंस्थापक भानुप्रताप सिंग, फरीद आसान अणि अंकुश सचदेवा हे आहेत.
या तिघांनी आपले आय आयटीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम केले पण सर्व प्रकल्पात त्यांना अपयश आले.
मग यानंतर त्यांनी २०१५ मध्ये शेअरचॅट कंपनी सुरू केली अणि ह्या प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात केली ज्यात त्यांना भरपूर यश मिळाले.हया कंपनीचे कार्यालय बंगलोर येथे सुरू करण्यात आले होते.
ज्यात पन्नास लोकांची टीम होती ज्यात १८ डेव्हलपर्स तसेच इतरत्र ग्राफिक्स डिझायनरचा समावेश होता.फरीद यांना भारतामध्ये स्वताचे एक सोशल मिडिया नेटवर्क तयार करायचे होते.
आज शेअरचॅटवर रोज पन्नास लाखापेक्षा अधिक युझर्स सक्रिय असलेले आपणास दिसुन येतात.ज्यात दोन लाखापेक्षा अधिक युझर्स आपल्या मित्रांना सहकारींना शेअरचॅट दवारे संदेश पाठवत असतात.
ह्या अॅपवर जोक्स तसेच कोटस देखील समाविष्ट करण्यात आले आहेत.
आज शेअरचॅटचे भारतातच नव्हे तर अमेरिका ह्या देशात देखील करोडो सबस्क्राईबर आहेत.शेअरचॅट हे सर्व सोशल मीडियाचे एक भारतीय व्हर्जन म्हणून देखील ओळखले जाते.
तब्बल १४ वेळा अपयशी झाल्यानंतर देखील तीन मित्रांनी मिळून शेअर चॅट ही कंपनी कशी सुरु केली कसे ह्या कंपनीला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले हे आपण आजच्या लेखामध्ये जाणुन घेणार आहोत.
शेअरचॅट ही प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध असलेली एक अॅड्राॅईड अॅप आहे.ही अॅप भारतातील बोलल्या जात असलेल्या एकुण दहा भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शेअरचॅट मध्ये इंग्रजी सोबत हिंदी, भोजपुरी, गुजराती, तामिळ इत्यादी वेगवेगळ्या भारतातील वेगवेगळ्या राज्यात बोलल्या जात असलेल्या भाषा देखील उपलब्ध आहेत.
यात युझर्स वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये आपल्या पोस्टला कुठेही शेअर करू शकतात.
शेअरचॅट अॅपच्या पहिल्या यशानंतर भानुप्रताप,फरीद अंकुश ह्या तिघांना ३६ करोडची फंडिंग प्राप्त झाली होती यानंतर त्यांनी पुढचा फंड गोळा करण्यासाठी तयारी सुरू केली.
आज आपल्या भारत देशात तसेच अमेरिका ह्या देशात प्रत्येकी २४ करोडच्या आसपास सक्रीय वापरकर्ते आज फेसबुकचे आहेत.
फेसबुकवर युझर्सना लोकल भाषांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सुरूवातीला शेअरचॅट कंपनीला भारतात भाषेच्या मुळेच अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते.फोबर्सने आपल्या मासिकात अंडर ३० मध्ये ठेवले होते.
मग तिघे मित्रांनी मिळून सहा वर्षे एका प्रकल्पावर काम केले मग तिघेही व्यवसाय भागीदार बनले.मग त्यांच्यात चांगली घटट मैत्री झाल्यामुळे तिघांनी एकत्रितपणे अठरा प्रकल्पांवर काम केले ज्यातील चौदा प्रकल्पात त्यांना अपयश आले.
पुढे पंधराव्या प्रकल्पात त्यांना यश मिळण्यास सुरुवात झाली ज्यात ह्या तिघांनी एक चॅटिंग साईट तयार केली.पण त्यांचा हा प्रकल्प देखील अपयशी ठरला.
ह्या प्रकल्पात त्यांना ३२ हजार असे व्यक्ती निदर्शनास आले ज्यांना आपल्या लोकल भाषेत बोलणे अधिक चांगले वाटत होते.
मग त्यांनी ह्या समस्येवर उपाय शोधण्यास सुरुवात केली.कारण भारतातील अधिकतम वापरकर्त्यांना आपल्या लोकल भाषेत चॅटिंग करायची होती.
ज्यामुळे भारतात लोकल भाषेची मागणी देखील दिवसेंदिवस वाढत होती.
त्यातच काही वर्षांपूर्वी जिओदवारे फ्री डेटा अणि स्वस्त स्मार्टफोन बाजारात विक्रीसाठी आल्याने इंटरनेटचा वापर अधिक वाढला ज्यामुळे शेअरचॅटने भारतात अधिक मजबूत पकड प्राप्त केली.
पुढे शेअरचॅटने आपल्या प्रकल्पात इंग्रजी भाषेला वगळून युजर कंटेट सिस्टिमवर काम करण्यास सुरुवात केली.
तेव्हा केपी एमजीच्या एका रिपोर्ट नुसार असे समोर आले की २०२१ पर्यंत भारतातील वास्तव्यास असलेले ७५ टक्के लोक इंटरनेटचा वापर करतील.
२०२१ पर्यंत इंटरनेटवर हिंदीमध्ये लेखन वाचन करत असलेल्या युझर्सच्या संख्येत अधिक वाढ होईल.ज्यात मराठी बंगाली आणि तामिळ भाषा देखील समाविष्ट करण्यात आली होती.
मग ह्या अहवालाच्या आधारावर ह्या तिघे मित्रांनी एक योजना आखली. कारण त्यांच्या अॅपचे ७० टक्के पेक्षा अधिक वापरकर्ते १२ ते २५ ह्या वयोगटातील होते.ज्यात ७० वयोगटातील देखील लोक समाविष्ट होते.
ज्यात काही टक्के वापरकर्ते बाहेरील देखील होते त्यामुळे बाहेरील देशात बांगलादेश,कॅनडा, दुबई इत्यादी ठिकाणी देखील शेअरचॅट वरील कंटेट शेअर केले जात होते.
ह्या आधारावर शेअरचॅटने आपली एक रणनीती तयार केली.अणि इंग्रजी भाषेत नव्हे तर भारतातील वेगवेगळ्या राज्यात बोलल्या जात असलेल्या लोकल भाषेत कंटेट उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली.
शेअरचॅटची प्रगती होण्यामागील कारणीभूत असलेले काही प्रमुख घटक Main factor behind growth of sharechat
भारत सरकारने जेव्हा ५६ चीनी अॅप्सवर बंदी घातली होती ज्यात टीकटाॅक देखील समाविष्ट होते तेंव्हा फक्त तीन दिवसांत शेअरचॅट अॅपला दीड करोडपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केले होते.
,,मी मराठी हिन्दू आहे. सगल्यांना एकच संदेश देत आहे की कुठल्याही जातीचा असो पहील्यांदा हिन्दू आहे आणि एकत्रित त होने हेच महत्वाचे आहे. जय महाराष्ट्र,ംजय शिवाजी महाराज की जय. जय हिन्दू कि, जय भारत.